Breaking News

उरणमध्ये विद्यार्थीनींसाठी व्याख्यान

उरण : प्रतिनिधी

नवदुर्गा नवरात्रौत्सव मंडळ, बोरी आणि युईएस स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर व सिनीअर कॉलेजच्या विद्यार्थीनींसाठी तारुण्याच्या वाटेवर या विषयावर व्याख्यान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात उलवेतील चाईल्ड केअर कन्सलटंट डॉ. माधवी गोसावी ह्यांच्या भाषणाने झाली. ज्यात त्यांनी विद्यार्थीनीना आपल्या अनुभवाचे बोल सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. पराग कारोळकर ह्यांनीही तारुण्याच्या वाटेवरच्या महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थीनींना उलगडून सांगितल्या.

या वेळी यु.ई.एस.चे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, माजी अध्यक्ष व सदस्य डव्होकेट राजेंद्र भानुशाली, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या सोनाली म्हात्रे, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, माध्यमिक, प्राथमिक व पुर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका, सिनिअर कॉलेजच्या एचओडी तसेच ‘राष्ट्रीय सेवा योजना’ कार्यक्रम अधिकारी आणि ज्युनिअर व सिनीअर कॉलेजच्या विद्यार्थीनी, शिक्षक, नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्ष अतुल ठाकूर, नंदन पानसरे, संतोष पवार व इतर पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply