Breaking News

सामाजिक कार्यकर्ते उमेश मढवी यांचा भाजपमध्ये प्रवेश; पाली शहर अध्यक्षपदी निवड

पाली : रामप्रहर वृत्त

आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाली (ता. सुधागड) येथील सामाजिक कार्यकर्ते  उमेश मढवी यांनी रविवारी (दि. 24) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार रविशेठ पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पालीतील गुजराती समाज हॉलमध्ये रविवारी झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, रोहा मंडळ अध्यक्ष सोपान जांबेकर, महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैशाली मपारा, सुधागड तालुका अध्यक्ष आरती भातखंडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक श्वेता ताडफळे, श्रेया कुंटे, चंद्रकांत घोसाळकर, सागर मोरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रोहन दगडे, शिरीष सकपाळ , राजेंद्र गांधी, प्रसाद लखिमळे, अरविंद फणसे, नथुराम सकपाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उमेश मढवी यांची भाजपच्या पाली शहर अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठपणे दिलेली जबाबदारी पार पाडून पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उमेश मढवी यांनी या वेळी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply