Breaking News

पनवेलमध्ये उद्यानाची साफसफाई; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर

पनवेल प्रभाग क्रमांक 18 मधील ठाणा नाका रोडवरील श्रीजी सोसायटी आणि नालंदा सोसायटी परिसरातील उद्यानात साफसफाई करण्यात आली. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

ठाणा नाका रोडवरील श्रीजी व नालंदा सोसायटी परिसरातील उद्यानात पावसाळ्यात गवत व झाडे झुडपे वाढली होती. तसेच पाऊस लांबल्यामुळे उद्यानात गवत आणि लहान झुडपे जास्त वाढली. सध्या मुलांना दिवाळीच्या सुट्या सुरू आहेत. त्यामुळे लहान मुले खेळायला उद्यानात यायला सुरुवात होणार होती, मात्र गवत आणि झुडपांंमुळे उद्यानात येणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो याचे गांभीर्य लक्षात घेत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍यांशी बोलून उद्यानातील वाढलेले गवत आणि झाडेझुडपे कापून घेतली. तसेच उद्यानाची साफसफाई करून घेतली. नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या या तत्पर कार्यपद्धतीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply