पनवेल : प्रतिनिधी

किल्ले स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेली 2000 रुपयांची रक्कम श्रीनाथ गायकवाड, अवधूत गायकवाड, प्रबुद्ध गायकवाड, वेदांत मोहकर, मंथन भोईर या मुलांनी महापौर सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘गडकरी’ या किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेली 2000 रुपयांची रक्कम श्रीनाथ गायकवाड, अवधूत गायकवाड, प्रबुद्ध गायकवाड, वेदांत मोहकर, मंथन भोईर या मुलांनी सहाय्यता निधीसाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केली.
एवढ्या लहान वयात असलेली समज पाहून महापौरांनी या मुलांचे कौतुक करून निधी दिल्याबद्दल आभार मानले.
महापौर सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वैद्यकीय कारणांसाठी, तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तव पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निधीचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper