Breaking News

कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व

कर्जत : प्रतिनिधी

सत्तारूढ शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीने कर्जत नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सोमवारी (दि. 14) झालेल्या निवडणुकांमध्ये वर्चस्व सिद्ध केले आहे. चारही विषय समित्यांवर महायुतीचे सभापती बिनविरोध विराजमान झाले आहेत. कर्जत नगर परिषदेच्या सभागृहात सोमवारी विषय समित्यांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी  तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना निवडणूक कामकाजकामी अधिकारी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी सहकार्य केले.

कर्जत नगर परिषदेमध्ये 18 नगरसेवक आहेत, त्यापैकी 10 नगरसेवक शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीकडे आहेत तर आठ नगरसेवक राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, शिवराय भिमराय क्रांती संघटना या महाआघाडीचे आहेत.

स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती : सभापती : अशोक ओसवाल, सदस्य-बळवंत घुमरे, विवेक दांडेकर, शरद लाड, ज्योती मेंगाळ.

पाणीपुरवठा व जलनि:सारण : समिती सभापती-प्राची डेरवणकर, सदस्य-विवेक दांडेकर, वैशाली मोरे, पुष्पा दगडे, मधुरा चंदन(पाटील).

सार्वजनिक बांधकाम नियोजन विकास समिती : सभापती-राहुल डाळींबकर, सदस्य-नितिन सावंत, संचिता पाटील, उमेश गायकवाड,

सोमनाथ ठोंबरे.

महिला व बालकल्याण समिती : सभापती-विशाखा जिनगरे,उपसभापती-संचिता पाटील सदस्य- स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, भारती पालकर.

स्थायी समिती सभापती -नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, सदस्य -अशोक ओसवाल, प्राची डेरवणकर, राहुल डाळींबकर, विशाखा जिनगरे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply