Breaking News

Monthly Archives: October 2019

महायुतीचे उमेदवार, पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर उद्या अर्ज भरणार

पनवेल : भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांकडे दाखल करणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली. दोन वेळा बहुमताने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर हे एक …

Read More »

चांभार्लीतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली चांभार्ली व अळीआंबिवलीतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मंगळवारी (दि. 1) प्रवेश केला. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष बापू घारे, दत्ता जांभळे, प्रवीण जांभळे, ज्ञानेश्वर मुंढे, अरुण दळवी, मंदार गोपाळे, प्रमोद कांबळे, अमित मांडे, अविनाश गाताडे, प्रमोद जांभळे, सचित कुरंगळे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे …

Read More »

माथेरानमध्ये आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटली

कर्जत : बातमीदार येथील सिलिया पॉइंट व किंग जॉर्ज पॉइंटच्या दरम्यान एका महिलेने रविवारी दुपारी आत्महत्या केली होती. त्या वेळी तिची पर्स सापडली. त्या पर्समध्ये घरचा पत्ता असल्यामुळे तिची ओळख पटली आहे. गेली दोन दिवस रेस्क्यू टीम शोधकार्यात व्यस्त होती. दरीचा जंगल भाग तपासल्यानंतर 1000 फूट खोल दरीत तिचा मृतदेह …

Read More »

संशोधक म्हणून स्वत:ला घडवा

प्रा. डॉ. बापूराव शिंगटे यांचे आवाहन खोपोली : प्रतिनिधी कोणत्याही विषयात पारंगत होण्यासाठी दर्जेदार पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. ज्ञानाला प्रात्यक्षिकाची जोड हवी. स्वयं अध्ययनावर भर देत आपली जिज्ञासा वृत्ती जोपासून युवकांनी समाजोपयोगी असे संशोधन करावे, असे आवाहन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. …

Read More »

‘साप वाचवा’ संदेश घेऊन ऋषिकेश शिंदे यांची सायकल सफर

शेतकरी व आदिवासी बांधवांत जनजागृती कडाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यामधील सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये विषारी, बिनविषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळतात, मात्र सापांविषयी अपुरी माहिती असल्याने सर्व सापांना विषारी साप म्हणून मारले जाते. त्यामुळे सापांच्या काही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचे  गांभीर्य लक्षात घेऊन सर्पमित्र ऋषिकेश शिंदे (कर्जत) यांनी सायकलवरून रायगड जिल्ह्यात …

Read More »

‘शासकीय योजनांचा फायदा करून घ्यावा’

पेण : प्रतिनिधी बचतगटांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी उन्नती साधावी, असे प्रतिपादन रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रकाश देवरुषी यांनी अंतोरे (पेण) येथे केले. राज्यात 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अंगणवाडी पोषण पूरक आहार महाअभियान राबविण्यात आले. त्याचा सांगता समारंभ अंतोरे येथे आयोजित करण्यात …

Read More »

बामणगावील ग्रामस्थ भाजपत

सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील बामणगाव ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार राऊत, उपसरपंच मेघा थळे, सदस्य ममता भादाणकर, चैताली पाटील, चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी (दि. 1) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे अलिबाग मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी भाजपत स्वागत केले. भाजप राज्य परिषद …

Read More »

माजी मंत्री रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर

पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जल्लोष पेण : प्रतिनिधी पेण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, महासंग्राम, रयत क्रांती मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री रविशेठ पाटील यांची उमेदवारी मंगळवारी (दि. 1) जाहीर झाली. भाजपच्या  पहिल्या यादीतच रविशेठ पाटील यांचे नाव जाहीर झाल्याने पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके …

Read More »

ज्येष्ठ नागरिक दिन

1 ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून  दरवर्षी साजरा केला जातो. ’कोई लौटा दो मेरे बिते हुए दिन’ म्हणणार्‍या या ज्येष्ठांना सहानुभूती व्यक्त केली जाते. शासन आपल्या स्तरावर काही योजना जाहीर करून आपला सहभाग दाखवून देते. त्यांच्यावर कुटुंबातून होणार्‍या अत्याचारात वाढ होत असल्याने कुटुंबात त्यांचा सन्मान राखावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या …

Read More »

मनामनातला महात्मा

मोदीजींच्या एका हाकेसरशी गांधीजींच्या या देशात ‘स्वच्छता अभियाना’ला प्रत्यक्ष आरंभ झाला. स्वत:च्या हाती झाडू घेणारा पंतप्रधान या देशाने प्रथमच पाहिला. स्वच्छता अभियान, गावे दत्तक घेण्याची योजना यांनी बघता-बघता चळवळीचे रूप धारण केले. गावोगावी उघड्यावर शौच करण्याची भारतीय सवय मोडू लागली. गेल्या पाच वर्षांत अकरा कोटींहून अधिक शौचालये देशभरात बांधून काढण्यात …

Read More »