पनवेल : वार्ताहररायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या गृह विभागाकडून बुधवारी (दि. 7) भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या बदलीने पदस्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले. या आदेशानुसार रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर …
Read More »Yearly Archives: 2020
आयपीएल सट्टा लावणारे रॅकेट कर्जतमध्ये उद्ध्वस्त
अलिबाग : सध्या संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या सामन्यांसाठी सट्टा लावणारे एक मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) रायगडने उद्धवस्त केले आहे. यात वेगवेगळे बुकी व त्यांचे मध्यस्थ अशा एकूण 11 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 16 मोबाइल फोन जप्त करण्यात …
Read More »गुटखा विक्री करणार्यांवर कामोठ्यात कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फैलावत चालला असून रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. पनवेल महानगरपालिका व संबंधित पोलीस ठाणे यांच्यामार्फत नियम मोडणार्या दुकानांवर व व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. नुकतेच कामोठे येथे कामोठे पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूच्या रस्त्यावर मेघना वाईन्ससमोर ह्युंदाई इऑन या चारचाकीमध्ये संपूर्ण गाडी …
Read More »नवी मुंबईत बसस्थानकांवर लागताहेत नागरिकांच्या लांबच लांब रांगा; लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
पनवेल : बातमीदार टाळेबंदी शिथिलीकरणानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व व्यवहार आता पूर्ववत सुरू झाले आहेत. नागरिकांनाही आता कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र या शहरांची जीवनवाहिनी असलेली लोकल मात्र अद्याप सुरू करण्यात न आल्याने नवी मुंबईतून मुंबई, ठाण्यात प्रवास करताना नोकरदारांचे नाकेनऊ येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सर्व ताण …
Read More »सुरक्षाकवच नसल्याने सफाई कर्मचारी एकवटले; सिडकोविरोधात ठिय्या
पनवेल : वार्ताहर सिडकोकडे काम करणार्या 700 पेक्षा जास्त सफाई कामगारांना कोरोना काळात सेवा बजावत असताना कोणतेही सुरक्षाकवच नाही. परिणामी संबंधितांना आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना सुरक्षितता नाही. त्यामुळे संबंधितांना सुरक्षा विमा देण्याबरोबर इतर सुविधांसाठी आझाद कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 5) एल्गार पुकारण्यात आला होता. कामगारांनी सिडको …
Read More »उरण भाजपतर्फे राज्य सरकारच्या आदेशाची होळी
उरण : वार्ताहरशेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कृषी कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार नसल्याचे महाविकास आघाडी सरकारने म्हटले आहे. त्यामुळे या संदर्भातील राज्य सरकारच्या आदेशाची उरण भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 7) होळी करून जाहीर निषेध करण्यात आला.या वेळी उरण भाजप कार्यालयासमोर आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, …
Read More »राज्यातील बळीराजाच्या विकासाला स्थगिती देणार्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध
कृषी कायद्याची अंमलबजावणी करा; पनवेल भाजपची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र सरकारने संसदेत संमत केलेल्या कृषी विधेयकांचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झालेले आहे. या महत्त्वपूर्ण अशा कायद्यामुळे बळीराजाच्या विकास व प्रगतीचा मार्ग मोकळा झाला असताना केवळ दलालांच्या फायद्यासाठी कृषी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यास महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे. राज्य …
Read More »शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती महत्त्वाची
डॉ. रवींद्र मर्दाने यांचे प्रतिपादन कर्जत ः बातमीदार कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता भाताऐवजी भात-भाजीपाला, भात-कडधान्य ही पीकपद्धती स्वीकारून त्यास यांत्रिकीकरण व कृषिपूरक उद्योगधंद्यांची जोड द्यावी. शेतीतून शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती अवलंबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. दापोलीतील डॉ. …
Read More »एसटी कर्मचारी आर्थिक संकटात
महाड आगारातील कर्मचार्यांचा तीन महिन्याचा पगार रखडला महाड : प्रतिनिधी कोरोना संसर्गामुळे एप्रिल महिन्यापासून बंद असणारी ग्रामिण भागातील जीवनवाहिनी एसटी गेल्या महिनाभरापासून हळू हळू धावू लागली आहे. मात्र प्रवाशांकडून मिळणार्या अल्प प्रतिसादामुळे पुरेसे उत्पन्न नसल्याने आधीच तोट्यात असणार्या राज्य परिवहन महामंडळाचा तोटा वाढत आहे अशा परिस्थितीत कर्मचार्यांच्या पगारासाठी लागणारा निधी …
Read More »श्रीवर्धनमध्ये महावितरणचा सावळागोंधळ
श्रीवर्धन ः प्रतिनिधी संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात महावितरणचा वीजपुरवठ्याबाबत सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांपासून दर दोन-तीन दिवसांनी वीजपुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात येतो. लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळानंतर श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तब्बल 28 दिवसांनंतर, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरू …
Read More »