दोन वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, यापैकी दोन रुग्ण माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11वर पोहोचली असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका-आयरे कांबळे यांनी दिली. माणगाव येथील तीन, तर इंदापूर व पन्हळघर येथील प्रत्येकी एक …
Read More »Yearly Archives: 2020
कुणी पत्रे देता का पत्रे?
निसर्ग चक्रीवादळानंतर शाळा दुरुस्तीसाठी पत्र्यांची कमतरता पाली : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील जवळपास तेराशेहून अधिक जिल्हा परिषद शाळा तसेच अनेक माध्यमिक व खाजगी शाळांचे अतोनात नुकसान झाले आहे. शाळा दुरुस्तीच्या कामांना वेग आला असला तरी शाळांचे छप्पर बसविण्यासाठी ठिकठिकाणी पत्र्यांचा तुटवडा असल्याने कुणी पत्रे किंवा कौले देतो का, अशी …
Read More »मुजोर चीनचा महाडमध्ये निषेध
महाड : प्रतिनिधीचिनी सैन्यासोबत सीमेवर झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या कृत्याचा महाड भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 18) चवदार तळे येथे चीनचा राष्ट्रध्वज आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला.चिनी सैन्य भारतीय सीमारेषेजवळ घुसखोरी करीत असून आपले जवानही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. चीनविरुद्धच्या …
Read More »रायगड जिल्ह्याने पार केला दोन हजार रुग्णांचा टप्पा
पनवेल : रायगड जिल्ह्याने कोरोना रुग्णांचा दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात गुरुवारी (दि. 18) कोरोनाच्या 84 रुग्णांची भर पडली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 51, पनवेल ग्रामीणमधील 17, उरण तालुक्यातील सात, अलिबाग तालुक्यातील सहा आणि पेण तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे, …
Read More »यंदा गणेशोत्सवही साधेपणाने
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर निर्णय मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गुरुवारी (दि. 18) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून, मंडळांनी सरकार देईल तो आदेश मान्य करणार असल्याचे …
Read More »वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करणार!
मुरूडमधील नागरिकांचा महावितरणला इशारा मुरूड : प्रतिनिधीमुरूड शहरासह तालुक्यातील 72 गावे गेल्या 16 दिवसांपासून वीजपुरवठ्याविना अंधारात आहेत. नागरिक या परिस्थितीला वैतागले असून, त्यांच्या भावनांचा बांध अखेर फुटला. तहसील कार्यालयात झालेल्या सभेत त्रस्त नागरिकांनी महावितरणच्या कासवछाप काराभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.निसर्ग चक्रीवादळ …
Read More »किल्ले रायगड अंधारात
निद्रिस्त राज्य सरकारचा भाजपकडून निषेध महाड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा फटका हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडलादेखील बसला आहे. पोल पडल्याने गडावरचा वीजप्रवाह गेल्या 15 दिवसांपासून खंडित आहे. याविरोधात निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 18) निषेध व्यक्त करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन …
Read More »आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत
भाजप युवा मोर्चा करणार स्वदेशीचा जागर पनवेल : रामप्रहर वृत्त‘आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये विदेशी बनावटीच्या वस्तूंऐवजी स्वदेशी विकल्पाबद्दल प्रसार व प्रचार करण्यासंदर्भात युवा मोर्चा जिल्हाभरात युवकांमध्ये जागृती करणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाने प्रभावित होऊन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत’ …
Read More »तिघाडी काम बिघाडी
राज्यातील तीन चाकी महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद एव्हाना पुरेसे चव्हाट्यावर आले आहेत. जुन्या खाटांचे कुरकुरणे सरकारमधील भागीदार पक्षानेच जगजाहीर केले. अखेर बर्याच कुरकुरण्यानंतर नाराज काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक गुरुवारी पार पडली असली तरी तिघाडी काम बिघाडी हेच अखेर खरे ठरणार! सत्तेच्या लोभातून कुटिल डावपेच खेळून जनाधार नसतानाही सत्ता काबीज केल्यानंतर …
Read More »पनवेलमध्ये 68 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात 68 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला. तर 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 51 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 32 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 17 नवीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper