Breaking News

Yearly Archives: 2020

जुम्मापट्टी आणि माथेरान घाटात पर्यटकांची गर्दी; आदिवासींची पोलिसांत तक्रार

कर्जत : बातमीदार  – लॉकडाऊनमधून सूट देऊन जनतेला मुभा देण्यात आली आहे, मात्र त्याचा गैरफायदा उठवला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील असंख्य पर्यटक सध्या नेरळ-माथेरान घाटात आणि जुम्मापट्टी येथे येत आहेत. या अनपेक्षित पर्यटकांमुळे स्थानिक आदिवासी लोकांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीचे सावट पसरले आहे.दरम्यान, स्थानिक आदिवासींनी नेरळ पोलीस ठाण्याच्या निवेदन देऊन त्या …

Read More »

माणगावमध्ये भात भिजला; शेतकरी संकटात

माणगाव : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाने संबंध दक्षिण रायगड उद्ध्वस्त केला असून माणगाव तालुकादेखील त्याला अपवाद राहिला नाही. शेतात रात्रंदिवस राबून कष्टाने पिकविलेला भात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाकडे महाराष्ट्र राज्य मार्केट फेडरेशनच्या शासकीय भात खरेदी केंद्रामध्ये शासनाची हमीभाव किंमत मिळविण्याकरिता दिलेला होता. हा भात वादळी पावसात भिजला आहे. …

Read More »

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

नोकरवर्ग आणि विद्यार्थ्यांना अडथळा खोपोली : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त फटका महावितरणला बसला आहे. अथक परिश्रमानंतर खोपोली व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला खरा, मात्र त्यानंतरही वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण आहेत. याचा सर्वांत मोठा फटका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरून ऑनलाइन काम करीत असलेले नोकरदार आणि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना …

Read More »

रायगडात सलग दुसर्‍या दिवशी चौघांचा मृत्यू; 63 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 15) सलग दुसर्‍या दिवशी कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, 63 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 44, पनवेल ग्रामीणमध्ये सात, पेण तालुक्यात सहा, अलिबाग तालुक्यात तीन, माणगाव तालुक्यात दोन आणि उरण तालुक्यात एक रुग्ण आढळला आहे, तर मृतांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील …

Read More »

राज्यातील शाळा होणार सुरू

मुंबई : प्रतिनिधीराज्यातील शाळा जुलै महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी (दि. 15) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक झाली. या बैठकीनंतर ऑनलाइन आणि प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. शिक्षण विभागाने राज्यात जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची तयारी …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदत

नागोठणे : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागोठणे विभागातील आमडोशी आणि वांगणी या गावांतील नागरिकांना सोमवारी (दि. 15) स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते नुकसानीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.वांगणीतील ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, रोहे पंचायत समितीचे …

Read More »

टचलेस हॅण्ड सॅनिटायझर मशीन

कर्जत : प्रतिनिधीसॅनिटायझर हा शब्द आपण यापूर्वी कधीतरी ऐकलेला असेल, परंतु कोरोनाच्या महामारीदरम्यान सॅनिटायझरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या सर्रास हात सॅनिटाइझ करून घ्यावे लागतात, पण प्रत्येकाच्या हाताचा स्पर्श सॅनिटायझरपात्राला होतो. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील चार अभियांत्रिकी युवकांनी स्पर्श न होता हात सॅनिटाइझ होतील असे टचलेस …

Read More »

नेरळची बाजारपेठ तीन दिवस राहणार बंद

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थांचा निर्णय कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीत आणि ग्रामपंचायत हद्दीला लागून असलेल्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नेरळची बाजारपेठ सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सोमवारी (दि. 15) पहिल्याच दिवशी प्रतिसाद लाभला.नेरळ गावात मोहाचीवाडी आणि खांडा भागात …

Read More »

भाजपतर्फे वादळग्रस्तांना पत्रेवाटप

अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. या वादळग्रस्तांना सरकारी मदत अद्याप मिळालेली नाही. अलिबाग विभागातील गरजू वादळग्रस्तांना भारतीय जनता पक्षातर्फे सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले.3 जून रोजी कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने अक्षरश: होत्याचे नव्हते केले. रायगड जिल्ह्याला या नैसर्गिक आपत्तीचा फार मोठा फटका बसला. …

Read More »

केंद्राचे पथक आज रायगडात; नुकसानीची करणार पाहणी

अलिबाग : प्रतिनिधीकोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक दोन दिवसांच्या पाहणी दौर्‍यावर येणार आहे. केंद्राचे हे पथक मंगळवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात पाहणी करून नुकसानीचा आढावा घेणार आहे.कोकणात 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिकांच्या मालमत्तांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता …

Read More »