Breaking News

Yearly Archives: 2020

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे उपाशी

जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी पनवेल : बातमीदार : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 24) केली. त्याला परिसरात त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिक घरातच बसून आहेत, मात्र याचा फटका हातावर पोट असणार्‍या नागरिकांना बसत असून त्यांना एका वेळच्या जेवणाची देखील भ्रांत आहे. …

Read More »

राजेंद्र मांजरेकर यांच्यातर्फे पोलिसांना अल्पोपाहार

खारघर : रामप्रहर वृत्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांना सेवा पुरविणार्‍या आस्थापनावर अतिरिक्त जबाबदारीचा भर पडला. त्यामुळे खारघर-तळोजा मंडळाचे संयोजक राजेंद्र मांजरेकर यांनी जीवाची व आरोग्याची पर्वा न करता दिवसरात्र नागरिकांची सेवा करणार्‍या पोलिसांना 21 दिवस चहा बिस्कीट देण्याचा संकल्प केला. तसेच मांजरेकर …

Read More »

नवीन पनवेलमध्ये नागरिकांच्या गॅस एजन्सीसमोर मोठ्या रांगा

पनवेल : प्रतिनिधी : कोरोनामुळे देशात  मंगळवार मध्यरात्रीपासून कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे आता अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. स्वयंपाकचा गॅस मिळणार नाही, अशा अफवा पसरल्याने नवीन पनवेलमध्ये नागरिकांनी गॅस एजन्सीच्या समोर मोठ्या रांगा लावल्या आहेत. त्याठिकाणी कोणतीही सुरक्षा घेण्यात येत नव्हती. नवीन पनवेलमध्ये सिडको कार्यालयाच्याजवळ एचपी आणि भारत गॅस कंपनीचे वितरक …

Read More »

पनवेल महापालिकेनेही थुंकणार्यांकडून दंड घेणे गरजेचे

पनवेल : प्रतिनिधी : राज्यात संचारबंदी लागू असताना देखील नागरिक बाहेर पडत असल्याने याचा परिणाम भयंकर होऊ शकतो याची जाणीव अद्याप नागरिकांना होत नसल्याने पोलिसांना आता रस्त्यावर भटकणार्‍यांवर चोप देण्याची वेळ आलेली आहे. या वेळी रस्त्यावर थुंकलेल्या रिक्षावाल्याला पोलिसांनी रस्ता साफ करायला लावून अद्दल घडवली. मुंबई महापालिकेप्रमाणे आता पनवेल महापालिकेनेही …

Read More »

डी मार्ट बंद करा -संतोष शेट्टी

पनवेल : प्रतिनिधी : कोरोनामुळे संपूर्ण देशात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्फ्यू जाहीर केला. या वेळी मेडिकल, किराणा, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. डी मार्ट सारख्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरचा यामध्ये समावेश आहे. पण या डिपार्टमेंटल स्टोअरमुळे कोरोना संक्रमणाचा मोठा …

Read More »

उरणमध्ये भाज्यांची चढ्या दराने विक्री

वस्तू महागल्या; नागरिक हैराण  शासनाने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी उरण : वार्ताहर : सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केल्यापासून लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु याचा काही लोक फायदा घेत चढ्या दराने भाजीपाला व काही जीवनावश्यक वस्तू विकत असल्याचे उरण तालुक्यात पहावयास मिळत आहे. याची तत्काळ दखल …

Read More »

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला

आवश्यक तिथे सहकार्याचा हात देणार : मोहन भागवत नागपूर : प्रतिनिधीकोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत दक्ष नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्याचे काम संघ स्वयंसेवकांनी सुरू केले आहे. प्रशासनाच्या सल्ल्याने व परवानगीने आवश्यक तिथे सहकार्याचा हात दिला जात आहे. समाजानेही सरकारच्या सूचनांचे पालन करून कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करावा,’ असे आवाहन …

Read More »

खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना

खालापूर, खोपोली : प्रतिनिधीदुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपयाचा तगादा लावणार्‍या पतीच्या छळाला कंटाळून पूजा जयेंद्र जाधव (वय 22) हिने साडीद्वारे गळफास घेतल्याची हृद्ययद्रावक घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पूजाच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.कर्जत तालुक्यातील मुगपे हे माहेर असलेल्या पूजाचे 2018मध्ये खालापूर तालुक्यातील मिळगाव कातकरवाडी येथे …

Read More »

नागरिकांनी उभारली निरोगी आरोग्याची गुढी

पनवेल : रामप्रहर वृत्तगुढीपाडव्याचा सण बुधवारी (दि. 24) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा नागरिकांनी निरोगी आरोग्याची गुढी उभारल्याचे चित्र दिसून आले.  चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षारंभ होतो. भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. केवळ धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिकच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही हा …

Read More »

राज्याला अवकाळीचा तडाखा

पुणे : प्रतिनिधीपुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये बुधवारी (दि. 24) विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पुण्यातील कात्रज, हडपसर या भागांत सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे काही क्षणांत रस्ते जलमय झाले. राज्यात आधीच संचारबंदी लागू करण्यात आलेली असल्याने पावसामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही. दरम्यान, हवेत मात्र गारवा निर्माण झाला असून …

Read More »