Breaking News

Monthly Archives: August 2021

शेकाप ग्रामपंचायत सदस्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाच्या खैरवाडी ग्रामपंचायतीमधील विद्यमान सदस्य करुणा पांडुरंग भगत आणि शेकाप कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 21) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षाची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.भाजपच्या …

Read More »

अमेरिकेत खेळण्यासाठी भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूची निवृत्ती; मनन शर्माचा भारतीय क्रिकेटला अलविदा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनन शर्मा याने भारतीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. चांगल्या संधींसाठी तो कॅलिफोर्नियाला जाणार आहे. माजी भारतीय खेळाडू अजय शर्मा यांचा मुलगा मनन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विराट कोहली, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत यांच्यासह ड्रेसिंग रूम शेअर केला आहे. 2017मध्ये दिल्लीत पदार्पण केल्यापासून मननने …

Read More »

प्रो कबड्डी लीग ः 59 खेळाडू कायम

मुंबई ः प्रतिनिधी डिसेंबरमध्ये होणार्‍या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामासाठी ऑगस्टअखेरीस होणार्‍या लिलावाआधी एकूण 59 कबड्डीपटूंना संघांनी कायम राखले आहे, परंतु प्रदीप नरवाल, दीपक हुडा, राहुल चौधरी, सिद्धार्थ देसाई आणि रोहित कुमार यांचा कायम राखलेल्या कबड्डीपटूंमध्ये समावेश नसल्यामुळे आगामी लिलावातील त्यांच्या किमतीची उत्कंठा वाढली आहे. मुंबईत 29 ते 31 ऑगस्ट …

Read More »

भारतात पुढील वर्षी फॉर्म्युला-4 शर्यतींचा थरार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विभागीय भारतीय अजिंक्यपद आणि फॉर्म्युला-4 भारतीय अजिंक्यपद शर्यती देशात आयोजित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने हिरवा कंदील दिला आहे. रेसिंग प्रमोशन्सतर्फे फेब्रुवारी 2022मध्ये भारतातील नवी दिल्ली, चेन्नई, कोईम्बतूर आणि हैदराबाद या शहरांत विभागीय अजिंक्यपद शर्यतींच्या आयोजनाची योजना आहे. आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने प्रमाणित केलेल्या एफ 3 गाड्या या …

Read More »

भूखंड विक्री योजनांतील अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी सिडकोतर्फे मुदतवाढ

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाने, भूखंड विक्री योजनांतील भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरू केले असून यामुळे अर्जदारांना आपल्या पसंतीच्या भूखंडाचे निश्चित स्थान कळणे अधिक सुलभ होणार आहे. याचबरोबर विहित केलेल्या मुदतीत अर्जदार जर पहिला व दुसरा हप्ता भरू शकले नाहीत तर यथायोग्य प्रकरणामध्ये अशा अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी मुदत …

Read More »

भाजप ज्येष्ठ कार्यकता सेलची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप ज्येष्ठ कार्यकर्ता पनवेल शहर सेलच्या पदाधिकार्‍यांची शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी 6 वाजता बैठक भाजप मुख्य कार्यालयात झाली. या बैठकीस शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल यांनी मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणार्‍या सुविधांवर चर्चा करण्यात आली तसेच यासंदर्भात …

Read More »

सभापती सुशिला घरत यांच्या स्वखर्चाने नवीन पाइपलाइनचे काम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग ’ड’ सभापती सुशिला जगदीश घरत व सामाजिक कार्यकर्ता जगदिश घरत यांनी नवीन पनवेलमधील पीएल 5।52 बिडींगमध्ये स्वखर्चाने नवीन पाइपलाइनचे काम करून दिले. त्यामुळे तिसर्‍या मजल्यावर पर्यंत पाणी पोहचून रहिवाशांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण झाला. काही दिवसांपासून पीएल 5।52 सेक्टर 17 बिडींगमध्ये पाण्याची समस्या निर्माण …

Read More »

वाहनचालकांच्या बेपरावाईमुळे प्राण्यांचे बळी

कर्नाळा पक्षी अभयारण्यातील वन्यजीव असुरक्षित; महामार्गावर प्राण्यांचे वारंवार अपघात पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरात प्राणी सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. अभयारण्यातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या अंतर्गत करोडो रुपये खर्च करून मुंबई-गोवा महामार्गावर प्राणी येणार नाहीत यासाठी महामार्गाच्या दुतर्फा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत, परंतु या  …

Read More »

महेंद्र कल्याणकर रायगडचे नवे जिल्हाधिकारी

अलिबाग ः प्रतिनिधीरायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.निधी चौधरी यांची मुंबईतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे.

Read More »

झायकोव-डी लसीला मंजुरी; मुलांनाही घेता येणार

मुंबई ः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या विळख्यातून देश हळूहळू बाहेर पडत असला तरी संभाव्य तिसर्‍या लाटेची टांगती तलवार कायम आहे. या पार्श्वभूमीवर झायडस कॅडिला कंपनीच्या कोविड-19वरील लस झायकोव्ह-डीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत …

Read More »