Breaking News

Yearly Archives: 2022

राज्य बदलले तरी वाहनाचा नंबर राहणार तोच!

पनवेलमध्ये बीएच सिरीजच्या नोंदणीला सुरुवात पनवेल : वार्ताहर नवीन वाहने खरेदी करणार्‍या ग्राहकांना बीएच नोंदणीचा पर्याय मिळणार आहे. ज्या लोकांच्या नोकरीनिमित्त राज्ये बदलावी लागतात, त्यांना बीएच नोंदणीचा चांगला पर्याय असणार आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन विभागात बीएच सिरीजच्या नोंदणीला सुरुवात झालेली आहे. जर बीएच नोंदणीमध्ये वाहनाची नोंदणी केली, तर दुसर्‍या राज्यात …

Read More »

सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आद्य प्रचारक, पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रयत शिक्षण संस्थेच्या अ. पां. भोईर विद्यालय व रघुनाथशेठ जितेकर ज्युनिअर कॉलेज दापोली-पारगावमध्ये साजरी करण्यात आली. त्यानिमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. विद्यालयाच्या …

Read More »

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती -आमदार मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील विकासकामांना गती मिळावी तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे, याकरिता बेलापूरच्या आमदार  मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त  अभिजित बांगर यांची भेट घेतली. या वेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक …

Read More »

रुग्णसंख्या वाढत असताना चाचण्याही वाढविणार

‘अँटीजेन’साठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथके अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संशयित रुग्णांची आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची त्वरित तपासणी करून त्यांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याकरिता तालुकास्तरावर स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे, सदर पथकाद्वारे पंचायत समिती, तहसील कार्यालयांसह, …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील शाळाही बंद

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळा इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून 5 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसा आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी मंगळवारी (दि. 4) काढला. विद्यार्थ्यांचे लसीकरण मात्र सुरूच राहणार आहे पनवेल महापालिका हद्दीत कोविड-19चा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन …

Read More »

दक्षिण आफ्रिकेचाही पहिला डाव गडगडला; शार्दुल ठाकूरच्या सात विकेट

जोहान्सबर्ग ः वृत्तसंस्था भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजी केली. शार्दुलने सात गडी बाद करून आफ्रिकेच्या पहिल्या डावाला खिंडार पाडले. पहिल्या डावात द. आफ्रिकेने 229 धावा करीत भारताच्या 202 धावांचा टप्पा ओलांडला. यासह अफ्रिकेने 27 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतासमोर पुढील …

Read More »

सेतूबाधित प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीए यांच्यात सकारात्मक बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी (दि. 4) बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र …

Read More »

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे बुधवारी पनवेलमध्ये पारितोषिक वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18, 19 आणि 20व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी (दि. …

Read More »

सुदर्शन संघ सोनारसिद्ध चषकाचा मानकरी; कंपनीकडून खेळाडूंचा सत्कार

धाटाव ः प्रतिनिधी रोहा तालुका क्रीडासंकुलात नुकत्याच घेण्यात आलेल्या सोनारसिद्ध क्रिकेट स्पर्धेत औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुदर्शन कंपनीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे कंपनीतर्फे सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या वेळी कंपनीचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. …

Read More »

आयपीएलमध्ये नेहरा अहमदाबादचा प्रशिक्षक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराची इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी अहमदाबाद या नव्या संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोलंकी या संघाचे संचालकपद सांभाळतील. भारताला विश्वविजेतेपदाची दिशा दाखवणारे दक्षिण आफ्रिकन गॅरी कर्स्टन या संघाचे प्रेरक म्हणून सूत्रे स्वीकारण्याची …

Read More »