Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा विशेष ब्लॉक

लोणावळा, पुणे : प्रतिनिधी आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडे येणार्‍या मार्गिकेवर दुपारी 12 ते 2 असा हा दोन तासांचा हा ब्लॉक असणार आहे. अमृतांजन पुलाच्या अलीकडे अन पलीकडे म्हणजे किलोमीटर 45 आणि 45.800 किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्याने हा ब्लॉक …

Read More »

’दिबां’च्या नावाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलाय -केंद्रीय मंत्री कपिल पाटील

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय एव्हिएशन विभागाकडे पाठविला होता. त्या विभागाकडून हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी (दि. 8) वाशी येथे दिली. ते …

Read More »

माथाडी कामगार कायद्यात कोणतीही छेडछाड केली जाणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई :  रामप्रहर वृत्त माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध आहे. माथाडी कामगारांचे नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यात कोणत्याही परिस्थितीत छेडछाड केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 25) येथे दिली. माथाडी कामगार युनियनच्या वतीने स्व. आमदार …

Read More »

नेरूळ रेल्वे स्टेशनला अनधिकृत स्टॉल्सचा विळखा

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील नेरूळ स्थानकाची पश्चिम बाजू म्हणजे अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा अड्डा झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. स्थानकातील बाहेरची बाजू सिडकोने दुकानदारांना भाड्याने व्यवसायासाठी दिलेली आहे, परंतु स्थानकात शिरतानाच येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांना आपण एखाद्या खाऊ गल्लीत आलो की काय असा भास होतो. एवढा विळखा या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खुले पत्र

तोडफोडीवर मांडली भूमिका मुंबई  : प्रतिनिधी कोकणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होऊन एक मार्गिका सुरू होईल, तर डिसेंबर 2023अखेरपर्यंत संपूर्ण महामार्ग सुरळीतपणे सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. असे असताना काही विघ्नसंतोषींनी तोडफोडीचे सत्र अवलंबिले आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी गुरुवारी (दि. 10) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर, मनोज भुजबळ, जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, …

Read More »

भूपेंद्र बारसिंग यांच्या हस्ते वृक्षारोपण

सांगली : प्रतिनिधी विटा येथील यशोधन बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष तथा मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांच्या हस्ते या वेळी वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमावेळी दत्तात्रय बारसिंग, शशिकांत बारसिंग, महादेव बारसिंग, तुकाराम झेडे, कुंडलिक बारसिंग सिद्धार्थ बारसिंग, …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानक परिसरात तरुणाची हत्या

पनवेल ः वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानक मालधक्का परिसरात मंगळवारी (दि. 8) पहाटे चारच्या सुमारास एका 27 वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल शहरातील टिळक रोड, ओम बेकरीसमोर राहणार्‍या विकी चिंडालिया (वय 27) या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून …

Read More »

माडभुवनवाडी पुन्हा गजबजली

मोहोपाडा : प्रतिनिधी आपटा ग्रामपंचायत हद्दीतील माडभुवन ही आदिवासीवाडी डोंगराच्या पायथ्यालगत वसलेली आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर कधीही खचून खाली येऊ शकतो, म्हणून माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये आणि वन विभागाचे अधिकारी काटकर यांनी पाहणी केली. या वेळी तत्काळ निर्णय घेऊन जवळच असलेल्या गारमेंटच्या …

Read More »

समाजहितैषी!

समाजसेवी व्यक्तिमत्त्वं जसजशी वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने मोठी होत जातात तशा त्यांच्या सामाजिक जाणिवादेखील वृद्धिंगत होत असतात. पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिल्यावर याची मनोमन साक्ष पटते. जनहिताचा कळवळा आणि विकासाची तळमळ असलेल्या या नेत्याने आपल्या अथक कार्यातून पनवेलसह रायगड जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे… जनमानसात आदराचे स्थान …

Read More »