Breaking News

महत्वाच्या बातम्या

रोह्यात हातभट्टीची दारू जप्त

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील गोपाळवठ धनगरवाडी, कारवीने धनगरवाडी व कारवीने ठाकूरवाडी येथील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रायगड व ठाणे येथील अधिकारी, कर्मचार्‍यांनी 11 व 12 सप्टेंबर  रोजी केलेल्या संयुक्त कारवाईत हातभट्टीची दारू आणि रसायन मिळून एकूण दोन लाख सहा हजार 500 रुपयांचा …

Read More »

पिंगळसई गावातील देशमुख परिवाराचा एक कुटुंब एक गणपती

रोहे ः प्रतिनिधी तालुक्यातील पिंगळसई गावातील देशमुख तरुण मंडळाने एक गाव एक गणपती हा शिरस्ता 12 पिढ्या म्हणजेच 350 वर्षापासून अधिक काळ पारंपरिक पद्धतीने जोपसला आहे. रोहे शहरापासून दीड ते दोन किमी अंतरावर पिंगळसई हे गाव आहे. या गावात मोठ्या संख्येने देशमुख कुटुंब आहेत. त्यातील काही सदस्य नोकरी व्यवसायासाठी परगावीही …

Read More »

मिठाई दुकानदारांना बाप्पा पावला

गणेशोत्सवात मिठाई खरेदी वाढली खोपोली : प्रतिनिधी यंदाचा गणेशोत्सव जरी निर्बंधात साजरा होत असला, तरी कोरोनाच्या ओसरलेल्या दुसर्‍या लाटेमुळे खालापूर तालुक्यात बाप्पांचे आगमन उत्साहात झाले असून, या वेळी मिठाई विक्री चांगली होत असल्याने मिठाई दुकानदारांना बाप्पा पावला आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव मोठा असल्याने नियमात शिथिलता देण्यात आली नव्हती. सणासुदीलादेखील दुकाने …

Read More »

अभियांत्रिकी क्षेत्रातील अमूल्य रत्न : सर विश्वेश्वरैय्या

‘15 सप्टेंबर’ हा दिवस संपूर्ण भारतभरात ‘अभियंता दिन’ म्हणजेच ‘इंजिनियर्स डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. या विशेष दिनी अभियांत्रिकी प्रगतीचा आढावा घेत असताना एक बाब विशेषत्वाने जाणवली की आपल्या अभियंत्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या पाठीवर सर्वत्र आपल्या कार्याद्वारे विशेष मोहर उमटवली आहे आणि तीदेखील सर्व क्षेत्रात. फार विरळा क्षेत्र …

Read More »

आता निवडणुकीचे पडघम

कोरोना महासाथीच्या तिसर्‍या लाटेची प्रतीक्षा करत असतानाच अखेर राज्यातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम ओबीसी आरक्षणाविनाच जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीने जंग जंग पछाडले होते. तसेच अन्य राजकीय पक्षांनी देखील ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका होऊ न देण्याचा चंग बांधला होता. तथापि राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या …

Read More »

न्यायालयाच्या आदेशानुसार मी अधीक्षक कार्यालयात उपस्थित -नारायण राणे

अलिबाग : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 13) रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थिती लावली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 23 ऑगस्टला महाड येथील पत्रकार परिषदेत केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना महाड न्यायालयात …

Read More »

कोकणासह सर्वत्र पावसाचा जोर कायम

मुंबई : प्रतिनिधी राज्यात काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. रायगडमध्ये रविवारी (दि. 12) रात्रीपासून पाऊस सुरू आहे. कोयना, जायकवाडीसारख्या मोठ्या धरणांमधून विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसत …

Read More »

कुष्ठरुग्ण, दिव्यांगांसाठी लसीकरण मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आणि नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या पुढाकाराने कुष्ठरुग्ण आणि दिव्यांगांसाठी विषेश लसीकरण मोहीम सोमवारी (दि. 13) राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत झाला. महानगरपालिका आणि भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून कोरोना …

Read More »

हसन मुश्रीफांनी केला 127 कोटींचा घोटाळा; माजी खासदार किरीट सोमय्या यांची चौकशीची मागणी

मुंबई : प्रतिनिधी महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 13) पत्रकार परिषदेत केला. याबाबत सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे …

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने विद्युत पुरवठा सुरळीत

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील मनिष मार्केट ते बापटा वाडा परिसर काही तासांकरिता विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांसह पत्रकार गणेश कोळी यांनी नगरसेवक राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून या असुविधेबाबत माहिती दिली. सोनी यांनी तत्परतेने वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या साथीने अथक प्रयत्न करून या भागातील विद्युत पुरवठा …

Read More »