Breaking News

महत्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाने जनजीवन विस्कळीत केले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.रसायनी परिसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख सध्या खालावला असला तरी रसायनीकरांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे …

Read More »

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था; गणेशोत्सवापूर्वी डागडुजी करण्याची शासनाकडे मागणी

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील मार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळीचा प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. हे खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे. पनवेल तालुक्यातील …

Read More »

चेन स्नॅचिंग प्रकारांत वाढ; महिलांमध्ये दहशत; लुटारूंना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चैन स्नॅचिंगच्या घटना सुरुच असून या लुटारुंनी मागील काही दिवसांपासून पनवेल परिसरासह नवी मुंबईत हैदोस घातला आहे. या लुटारुंनी चार दिवसांमध्ये चार महिला व दोन पुरुष अशा सहा जणांच्या अंगावरील लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटून नेले आहेत. या लुटारुंनी नेरूळ आणि सानपाडा …

Read More »

विकासाची गरुडभरारी

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2021 मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपीमध्ये 20.1 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवण्यात आली आहे. हा आकडा 21.4 टक्क्यांच्या दराइतका असेल असे अनुमान रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले होते. त्याच्या जवळपासच हा आकडा आहे. याचा अर्थ एवढाच की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी …

Read More »

गुन्हेगारी प्रवृत्तीला राजकीय वरदहस्त -दरेकर; जखमी कल्पिता पिंपळे यांची घेतली रुग्णालयात भेट

ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यातील कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करीत असताना माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची दोन बोटे, तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. जखमी कल्पिता पिंपळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधान परिषद विरोधी …

Read More »

अफगाणिस्तानसंदर्भात भारताचा टास्क फोर्स सक्रिय

नवी दिल्ली ः अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य स्थापन झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मंजूर करण्यात भारताने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तानमधील बदलती परिस्थिती पाहता भारताच्या तात्कालिक प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी …

Read More »

पनवेल शहरात मानाच्या नवनाथ सांप्रदायातील मंडळींकडून घरगुती पारंपरिक जन्माष्टमी उत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त येथे शहरात मानाच्या 10 ते 12 ठिकाणी नवनाथ संप्रदायातील मंडळींकडून घरगुती स्वरूपात मोठ्या उत्साहात पारंपरिक जन्माष्टमीच्या उत्सवाचे आयोजन केले जाते, मात्र यंदाचा हा उत्सव कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. पनवेल शहरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांपासूनची प्रथा आणि परंपरा आजही कायम आहे. पनवेलला सांस्कृतिक …

Read More »

महाराष्ट्रात हा तर तालिबानी कारभार

भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांची टीका मुंबई : प्रतिनिधी दहीदंडी पारंपरिक पद्धतीनेसुद्धा साजरी करणार्‍यांवर गुन्हे आणि दडपशाहीचा कारभार करणार्‍या ठाकरे सरकारचा महाराष्ट्रात तालिबानी कारभार सुरू आहे का? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे. आज दहीदंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि गर्दी न …

Read More »

आंतरराज्य टोळीतील म्होरक्या गजाआड

फरार आरोपी शोधपथकाची कामगिरी खोपोली : प्रतिनिधी आंतरराज्य टोळीचा म्होरक्या अनिल श्यामवेल गायकवाड (वय 55, रा. गोवा गल्ली, तेलगु कॉलनी, विजयनगर निवास चाळ, संभाजीनगर दौंड, ता. दौंड, जि. पुणे) याला नुकतेच राहत्या घरातून उचलून जेरबंद करण्याची मोठी कामगिरी फरार आरोपी शोधपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, पोलीस शिपाई दीपक जाधव, …

Read More »

सेवासमाप्तीमुळे संतप्त कंत्राटी कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्यातील या कंत्राटी कर्मचार्‍यांनी आज काम बंद आंदोलन पुकारून शासनाचा निषेध केला. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जमलेल्या या कर्मचार्‍यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांची भेट …

Read More »