Breaking News

महत्वाच्या बातम्या

काळ्या काचा बसवणार्‍यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

एका दिवसात 76 चालकांकडून दंड वसूल पनवेल ः वार्ताहर चारचाकी वाहनांच्या कांचावर बसवलेल्या काळ्या फिल्मविरोधात पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी उघडलेल्या धडक मोहिमेंतर्गत एका दिवसात 76 गाड्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही करवाई करण्यात येत असल्याची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी …

Read More »

संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

युवासेनेचे निवेदन पनवेल ः वार्ताहर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी खोटे आरोप करीत उपमुख्यत्र्यांकडे पत्र दिले होते. त्यासंदर्भात युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील यांनी नवी मुंबई पोलीस उपायुक्तांकडे निवेदन देऊन गुन्हा दाखल कर्णयंतची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षनाव आणि पक्षाचे …

Read More »

उरण-नेरूळ रेल्वेमार्गाच्या रूळ तपासणीला प्रारंभ

उरणसह पाच स्थानकांची कामे प्रगतीपथावर उरण : प्रतिनिधी मागील 27 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नेरूळ ते उरण प्रवासी रेल्वे मार्गाच्या रुळांची तपासणी सुरू आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरील रेल्वेस्थानकांच्या कामालाही वेग आला आहे. त्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वेमार्गावरील वाहतूक लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उरण तालुका हा नवी मुंबईच्या विकासाचा …

Read More »

विराट कोहली बनला अलिबागकर!

अलिबाग : प्रतिनिधी निसर्गरम्य अलिबागची सर्वांनाच भुरळ पडलेली आहे. उद्योजक, राजकारणी, अभिनेते तसेच क्रिकेटर तेथील निसर्गाला मोहून अलिबागकर झाले आहेत. त्यामध्ये आता भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याची भर पडली आहे. अलिबागच्या आवासमध्ये विराटने सहा कोटींचा बंगला खरेदी केला आहे. त्याचा भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गुरुवारी (दि. 23) …

Read More »

रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टकडून मोफत रुग्णवाहिका

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठ्यातील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका रूजू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच भजनी मंडळाला वाद्य साहित्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्थेची भेट माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

नवी मुंबई पालिकेच्या आठ कर्मचार्‍यांना पदोन्नती

18 जणांना आश्वासित प्रगती लाभ नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध संवर्गातील आठ कर्मचार्‍यांना पदोन्नती तसेच 18 कर्मचार्‍यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कर्मचार्‍यांची पदोन्नती व आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे विषय मागील दीड वर्षापासून विशेष लक्ष …

Read More »

लोकअदालतीत साडेतीन कोटींची करवसुली

31 मार्चपर्यंत दंडात्मक रकमेवर सूट; लाभ घेण्याचे आवाहन नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी लोकअदालत या संकल्पनेव्दारे नागरिकांच्या शासकीय प्राधिकरणांकडे असलेल्या विविध सुविधांच्या देयकांबाबत तक्रारींविषयी सुनावणी घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यात येतो. अशाच प्रकारच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन नवी मुंबईत बेलापूर येथे करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रिलिटीगेशन व पोस्टलिटीगेशन असे दोन …

Read More »

माणगावजवळ मिनीबसची एसटीला धडक, सात प्रवासी जखमी

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील मुगवली गावच्या हद्दीत मिनीबसने दिलेल्या धडकेत एसटी बसमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 23) पहाटे 1.15च्या सुमारास घडला. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून महाडकडे चाललेल्या मिनीबसचा (एमएच 14-सीडब्लू 5508) चालक दिनेश दत्तात्रेय घबाड (वय 32, रा. काळेवाडी, पिंपरी …

Read More »

पनवेलमध्ये होळीसाठी शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल परिसरात होळी सण उत्साहात साजरा केला जातो. होळीमध्ये जाळण्यासाठी  लाकडाबरोबरच आता शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी आली असल्याची माहिती करंजाडे येथील तबेल्याचे मालक भरवाड कुटुंबीयांनी दिली. त्यामुळे झाडे वाचवा-पर्यावरण वाचवा हा उद्देश ही सफल होताना दिसत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करता …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात टेक्नो ब्रिन्क

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मार्फत 23 ते 25 फेब्रुवारी 2023  यादरम्यान ’टेक्नो ब्रिन्क’च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या टेक्नो ब्रिन्कचा प्रमुख उद्देश महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना आजच्या आधुनिक युगामध्ये वेगवेगळ्या …

Read More »