Breaking News

महत्वाच्या बातम्या

रूपे कार्डचा प्रवास आणखी वेगवान!

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com रूपे डेबिट कार्डचा वापर देशात वेगाने वाढला, मात्र नंतर आलेल्या रूपे क्रेडीट कार्डचा वापर या वेगाने वाढण्यास मर्यादा आहेत. व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांची मक्तेदारी डेबिट कार्ड व्यवसायात मोडून काढण्याचे काम रूपेने केले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक या देशी कार्डच्यामागे खंबीरपणे उभी असल्याने रूपे क्रेडीट कार्डचा …

Read More »

कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

मालती आंग्रे अध्यक्षपदी, तर विभावरी कुळकर्णी उपाध्यक्षपदी पनवेल : रामप्रहर वृत्त येथील कमळ महिला नागरी सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून मालती चंद्रकांत आंग्रे आणि उपाध्यक्ष म्हणून विभावरी विद्याधर कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे …

Read More »

’सीकेटी’त विविध दिन उत्साहात साजरे

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर सावरकरांची 26 फेब्रुवारी रोजी असलेली पुण्यतिथी, 27 फेबु्रवारी हा जागतिक मराठी गौरव दिन आणि 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन हे तीन दिवस जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमात एकत्रितपणे साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यवेक्षिका नीरजा …

Read More »

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून बाल्मर लॉरी सीएफएस येथील पर्ल फ्रेट सर्व्हिसेसच्या कामगारांना भरघोस पगारवाढ

बाल्मर लॉरी सीएफएस येथील पर्ल फ्रेट सर्व्हिसेसच्या कामगारांना भरघोस पगारवाढ उरण ः रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील भेंडखळ येथील बाल्मर लॉरी सीएफएस येथील पर्ल फ्रेट सर्व्हिसेस मधील कामगारांना दरमहा 4500 रुपयांची भरघोस पगारवाढ तसेच सुविधा देण्याचा करार झाला आहे. पर्ल फेट सर्व्हिसेसच्या माध्यमातून बाल्मर लॉरी …

Read More »

ओबीसी नेते जे. डी. तांडेल यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त ओबीसी समाजाचे नेते आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांचा वाढदिवस येत्या सोमवारी (दि. 28) आहे. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जे. डी. तांडेल हे रायगड टॅक्स कन्सलटंट्स असोसिएशनचे अध्यक्ष, अखिल आगरी समाज परिषदेचे कार्याध्यक्ष, ओबीसी जनमोर्चा, ओबीसी संघर्ष समन्वयन समिती आणि पनवेल-उरण …

Read More »

कॅन्सर रुग्णांसाठी कमी खर्चात केमोथेरपी

 रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या केंद्राचे उद्घाटन पनवेल ः प्रतिनिधी कर्करोगा या असाध्य खर्चिक आजारासाठी पनवेलकरांना मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी आता धाव घ्यावी लागणार नाही. पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या माध्यमातून कर्करोग रुग्णांसाठी कमी खर्चिक अशा परवडणार्‍या केमोथेरपी केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 25) डॉ. सलील पाटकर यांच्या ऑन्कुरा ऑन्कॉलॉजी केअर …

Read More »

युद्धाचे साइड इफेक्ट्स

रशिया आणि युक्रेन या शेजारी देशांमध्ये पेटलेले युद्ध अवघ्या जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या खाईकडे घेऊन चालले आहे काय अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे. त्यात तथ्य देखील आहेच. या युद्धामागची कारणे काहीही असली तरी या युद्धाचे पडसाद दीर्घ काळ आणि सर्वदूर उमटणार आहेत. युरोप-अमेरिकेप्रमाणेच या युद्धाची झळ भारतालाही निश्चितच बसणार आहे. …

Read More »

सीकेटी विद्यालयात परितोषिक वितरण सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2021 – 22 चा परितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 25) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या संचालिका आणि सदस्य शाळा समिती अर्चना परेश ठाकूर, माजी विद्यार्थीनी प्रियंका पुरोहित …

Read More »

कामोठे भाजपतर्फे मोफत ई-श्रम महानोंदणी अभियान

कामोठे : रामप्रहर वृत्त असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी भाजप कामोठे मंडळाच्या वतीने दोन दिवसीय मोफत ई-श्रम महानोंदणी अभियान राबण्यात येत आहे. या अभियानास शुक्रवार (दि. 25)पासून भाजपच्या कामोठे येथील कार्यालयात राबवण्यात येत आहे. या वेळी भाजपचे कमोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर विकास …

Read More »

युक्रेनमध्ये अडकले रायगड जिल्ह्यातील 25 विद्यार्थी

अलिबाग : प्रतिनिधी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतातील 12 हजारांपेक्षा जास्त लोक युक्रेनमध्ये असून त्यापैकी 1200च्यावर विद्यार्थी  आहेत. शिक्षणासाठी गेलेले रायगडमधील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये गेलेले अनेक भारतीय तेथे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत …

Read More »