पनवेल : प्रतिनिधी असंघटित कामगारांनी आपली सीएससीमार्फत ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे असल्याने महापालिकेच्यावतीने प्रभाग अधिकारी त्या त्या प्रभागांमध्ये असंघटित कामगारांच्या नोंदणी विषयीचे आवाहन करणार आहेत. या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे प्रतिपादन यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी केले. केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने दिनांक 31 डिसेंबर …
Read More »अमली पदार्थ बाळगणार्या बांगलादेशी नागरिकास अटक
पनवेल : वार्ताहर अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकास पनवेल तालुका पोलिसांनी खारपाडा-आपटा फाटा येथून ताब्यात घेतले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना आपटा फाटा-खारपाडा या ठिकाणी एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अत्यंत सतर्कतेने, शिताफीने सापळा रचून …
Read More »विविध मागण्यांसाठी आदिवासी आक्रमक
श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वात पनवेल तहसील कार्यालयासमोर मोर्चा पनवेल : वार्ताहर अद्यापही मुलभूत सोयी सुविधांपासून आदिवासी बांधव वंचित असल्याने त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 25) श्रमजिवी संघटना-महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, जिल्हा महिला प्रमुख कुंदा पवार, तालुका …
Read More »कर्जत रेल्वे स्थानकावर डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्याला सुरुवात
कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातील फलाटांवर एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्यास सुरुवात झाली आहे. तिकीटांचे आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी कर्जत स्थानकात येणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. आपला आरक्षित डबा शोधण्याच्या नादात कधी गाडी चुकायची तर काही वेळा डबा पकडण्याच्या नादात अपघातही व्हायचे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकात …
Read More »नेरळ कोलीवली येथे ज्ञानयज्ञ सोहळा
कर्जत : बातमीदार मानवी जीवनात चांगले काम करून किर्तीरूप उरावे. दुसर्याचे दोष दाखवून देण्यापेक्षा आपण किती गुणी आहोत, याचा विचार आधी करावा असे आवाहन हभप उत्तम महाराज बढे यांनी कोलीवली (ता. कर्जत) येथे केले. श्री संत वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने नेरळजवळील कोलीवली गावात अडीच दिवसांचा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात …
Read More »माथेरानमध्ये दोन घोड्यांना सरा रोगाची लागण; उपचार सुरु
कर्जत : बातमीदार मोटार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांच्या प्रवासासाठी घोड्यांचा वापर केला जातो. त्यापैकी दोन घोड्यांना सरा या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यांच्यावर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू असून पशुधन अधिकारी त्या घोड्यांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. माथेरानमधील व्यावसायिक राजेश जानकर यांचे घोडे तबेल्यात असताना गेली तीन दिवस …
Read More »गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद्ध्वस्त
52 हजाराचा मुद्देमाल केला नष्ट; नागोठणे पोलिसांची कामगिरी नागोठणे : प्रतिनिधी चेराटी, काळकाई जंगल परिसरातील गावठी दारू तयार करण्याच्या चार हातभट्ट्या नागोठणे पोलिसांनी बुधवारी (दि. 23) उद्ध्वस्त केल्या. यावेळी सुमारे 52 हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. चेराटी, काळकाई भागातील जंगलात गावठी दारू अवैध रित्या तयार करण्यात येत असल्याची माहिती नागोठणे …
Read More »पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी लिविंग लिजेंड पुरस्काराने सन्मानित
सचिनदादा यांना युरोपियन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट खालापूर : प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस या संस्थेने शुक्रवारी (दि. 25) बँकॉक येथे लिविंग लिजेंड हा पुरस्कार देवून सन्मानित केले. तर सचिनदादा धर्माधिकारी यांना सामाजिक कार्याबद्दल मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल …
Read More »पेण दुरशेतजवळ दुचाकीला अपघात; एकाचा मृत्यू
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळील दुरशेत गावाच्या हद्दीत बुधवारी पहाटे दुचाकी घसरून अपघात झाला. या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर त्याचा सहप्रवासी जखमी झाला. निकेश लक्ष्मण दोरकडे (वय 28) व अकलेश जाधव (वय 27, रा. वडाळा, मुंबई) हे दोघे दापोली येथील फोटोग्राफीचे काम उरकून दुचाकी (एमएच-01,डीयु-1364) वरून वडाळा …
Read More »युक्रेनमध्ये अडकले रायगड जिल्ह्यातील 25 विद्यार्थी
अलिबाग : प्रतिनिधी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतातील 12 हजारांपेक्षा जास्त लोक युक्रेनमध्ये असून त्यापैकी 1200च्यावर विद्यार्थी आहेत. शिक्षणासाठी गेलेले रायगडमधील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये गेलेले अनेक भारतीय तेथे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper