Breaking News

महत्वाच्या बातम्या

मंत्री गणेश नाईक, भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार

विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये चौक : प्रतिनिधीराज्याचे वनमंत्री म्हणून गणेश नाईक आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल चौक येथील कर्जत फाटा मैदानात सोमवारी (दि. 20) भाजपच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, …

Read More »

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत होणार्‍या नमो चषक 2025 भव्य क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 20) उलवे नोड येथे नमो चषक स्पर्धास्थळी अंतिम आढावा …

Read More »

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा उपक्रम रविवारी (दि. 19) झाला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करणार असल्याची ग्वाही दिली.येत्या तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा या …

Read More »

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगची सांगता रविवारी (दि. 19) कळंबोली येथील मैदानात झाली. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. दरम्यान, स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणार्‍या तब्बल दोन कोटी 82 लाख 67 हजार रुपयांच्या 10 विकासकामांचे भूमिपूजन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 19) भूमिपूजन करण्यात आले. …

Read More »

‘दीवार’ 50 वर्ष; तोच अनुभव, तोच थरार आजही कायम!

‘दीवार’ म्हणताच अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येतात… ते माझे शालेय वय. सत्तरच्या दशकात सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहावरील नवीन चित्रपटाचे डेकोरेशन पाह्यच्या अलिखित संस्कृतीनुसार मिनर्व्हा थिएटरवरचे दीवारच्या पोस्टर डिझाईनवरील शर्टाला गाठ घालून नजरेत खुन्नस भरलेला अमिताभचा भला मोठा कटआऊट, शशी कपूरचे पोलीस इन्स्पेक्टरचे रुपडे, निरुपा रॉयला मिळालेले मोठे स्थान …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे स्नेहसंमेलन रंगले

उलवे नोड : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय मराठी माध्यमाचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी(दि. 17) रंगले. या वेळी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर; रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे

मुंबई : रामप्रहर वृत्तराज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी (दि. 18) जाहीर करण्यात आली. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे. बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे, तर मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे देण्यात आली आहे. नागपूर व अमरावती चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; गव्हाण येथे तोडक कारवाईसाठीआलेले सिडकाचे पथक माघारी

पनवेल : रामप्रहर वृत्तगव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी(दि. 17) सिडकोचा अतिक्रमण विभाग पोलीस फौजफाट्यासह कारवाई करण्यासाठी आला असता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमुळे सिडकोच्या पथकाला नरमाईची पत्करत माघारी फिरावे लागले.उलवे नोड परिसरातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी सिडकोचा अतिक्रमण विभाग पोलीस …

Read More »

खालापुरातील शिवसेना उबाठा पदाधिकारी भाजपमध्ये

मुंबई : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघामधील आणि खालापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशकर्त्यांचे भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले.मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, …

Read More »