५४ विद्यार्थ्यांना ९५%पेक्षा अधिक गुण पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घोषित केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने नेत्रदीपक यश संपादन करत आपला दबदबा कायम राखला आहे. यंदाही शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेस बसलेले सर्व ३१० विद्यार्थी …
Read More »माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात सदस्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.माथेरानमध्ये हातरिक्षाचालकांचे ई-रिक्षाद्वारे पुनर्वसन करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ६ ऑगस्ट २०२५ रोजी दिला होता, मात्र या …
Read More »शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा गुणवंत खेळाडू घडविण्यात यशस्वी ठरली आहे. अकॅडमीतून प्रशिक्षण घेत असलेल्या काही होतकरू खेळाडूंनी जिल्हा व राज्य स्तरावर आपली दमदार छाप पाडत निवड मिळवली आहे.अमेय महेंद्र पाटील (टाकीगाव, उरण) याची महाराष्ट्र अंडर-१६ संघात, स्मित सुधीर पाटील …
Read More »नवीन पनवेल येथे भीम जयंती महोत्सव; गायक आनंद शिंदे यांचा बहारदार कार्यक्रम
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीचे औचित्य साधून नवीन पनवेल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित सहा दिवसीय भीम जयंती महोत्सवाने सध्या संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे. या भव्य महोत्सवात मंगळवारी (दि.१५) सायंकाळी सुप्रसिद्ध …
Read More »पत्रकारांसाठी लोणावळ्यात फाईव्हस्टार दर्जाचे विश्रामधाम साकार
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या लोणावळा येथील कै. दी. गो. तेंडुलकर स्मृती विश्रामधामाच्या विस्तारित व अत्याधुनिक कक्षाचे उद्घाटन जल्लोषात पार पडले. जलतरण तलावासह फाईव्हस्टार दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या या विश्रामधामामुळे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक उत्कृष्ट पर्यटन व विश्रांती …
Read More »टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि.११) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर खेळली जात आहे.उद्घाटन समारंभाला महापौर नितीन पाटील, भाजप पनवेल शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजारराव, गणेश कडू, शशिकांत …
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा सभापती विराजमान झाल्यानंतर ग्रामीण व आदिवासी भागातील विकासकामांना वेग आल्याचे चित्र दिसू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातील मोरबे, खैरवाडी, शिरवली आणि खानाव ग्रामपंचायत हद्दीतील एकूण १३ आदिवासीवाड्यांना पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती …
Read More »आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांची पनवेलमध्ये कातकरी समाजाच्या प्रश्नावर क्षेत्रभेट आणि बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ५३८ ए येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ९) पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीपूर्वी मंत्री डॉ. वुईके यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी झालेल्या बैठकीत कातकरी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कोल्हापूरच्या न्यू कॉलेजला २५ लाखांची देणगी
पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने योगदान देणारे दानशूर व्यक्तिमत्व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल २५ लाख रुपयांची भरघोस देणगी जाहीर केली आहे.या मदतीचा धनादेश गुरुवारी (दि.९) पनवेल येथे …
Read More »महापौर नितीन पाटील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट
फेरीवाले, अतिक्रमण व वाहतूक कोंडीवर चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी सोमवारी (दि.६) नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पनवेल महानगरपालिका हद्दीतील फेरीवाले व इतर अतिक्रमणे, वाढती वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित विविध संवेदनशील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper