लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय महिला टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करत देशाचा गौरव वाढवला आहे. ओवेरियन सिस्ट शस्त्रक्रियेनंतर तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर तिने केलेले हे पुनरागमन अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे.संदीप घोष यांची कन्या आणि १९५०च्या दशकातील नामवंत फुटबॉलपटू स्व. …
Read More »कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक
कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे होत असलेले मोठे नुकसान आणि वनगुन्ह्यांमधील कारवाईचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत आक्रमकपणे उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारने वनक्षेत्रात आग लावणे अथवा वणवे लावण्याच्या घटनांना पूर्णपणे आळा घालण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वनमंत्री गणेश नाईक …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी (दि. २४) विमानतळ परिसरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘दिबां’च्या प्रतिमेला अभिवादन करून नामकरणाच्या मागणीचा पुनरूच्चार करण्यात आला.यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, नवी मुंबई …
Read More »पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व नगरसेवक परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने आगामी काळातील नियोजन, विविध विभागांमधील समन्वय, मतदार यादीसंदर्भातील त्रुटी व अद्ययावतीकरणाचे कामकाज तसेच बूथस्तरीय तयारीचा सविस्तर आढावा घेत सखोल चर्चा करण्यात आली.या …
Read More »महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून व्यापक उपाययोजना -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले होते शासनाचे लक्ष मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केली जात असल्याचे सांगितले.आमदार …
Read More »पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या बेघर निवारा प्रकल्पाची शुक्रवारी स्थायी समितीचे सदस्य परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक दशरथ म्हात्रे, नगरसेविका सीताताई पाटील, कुसूम पाटील आदींनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, सुविधा व बांधकामाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.बेघर निवारा …
Read More »पनवेलमधील घेरावाडीत आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वीज जोडणीचा शुभारंभ
रसायनी : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील आपट्याजवळील घेरावाडीला अखेर वीज जोडणी मिळाल्याने येथील अंधार कायमचा दूर झाला आहे. या ऐतिहासिक कामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि.१९) कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात झाला. आदिवासी बंधू-भगिनींच्या घरात पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पोहचल्याने संपूर्ण घेरावाडीत दिवाळीसारखे वातावरण पहायला मिळाले.आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा …
Read More »भाजपची गव्हाण विभाग नूतन कार्यकारिणी जाहीर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकट करण्यासाठी गव्हाण जिल्हा परिषद विभाग आणि वहाळ पंचायत समिती उलवे नोड १च्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१९) झालेल्या …
Read More »प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना युवाशक्तीला नवी दिशा देणारी
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातील युवकांना रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करणारी महत्त्वपूर्ण योजना असल्याचे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर …
Read More »पनवेल महापालिकेच्या फॉग कॅनन वाहनांचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तवायू प्रदूषण आणि धूळकणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून अत्याधुनिक फॉग कॅनन वाहनांचे महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सदस्य नगरसेवक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी उद्घाटन करण्यात आले.पनवेल महापालिका मुख्यालय येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper