नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने द्वितीय मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेंडसेन याचा पराभव करीत बेल्जियन आंतरराष्ट्रीय चॅलेंज खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. आशियाई कनिष्ठ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणार्या 18 वर्षीय लक्ष्यने 34 मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिक्टरचा 21-14, 21-15 असा पराभव केला. या यशाबद्दल लक्ष्य सेन याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper