पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 1) कोरोनाच्या तब्बल 266 रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 136, पनवेल ग्रामीणमधील 31, पेण तालुक्यातील 20, रोहा 19, उरण, खालापूर व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी 15, कर्जत नऊ, श्रीवर्धन तीन, सुधागड दोन आणि तळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. सुदैवाने दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही तसेच 111 जण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा चार हजारांवर जाऊन 4212 एवढा झाला असून, मृतांची संख्या 134 इतकी कायम आहे. दरम्यान, पनवेल मनपा हद्दीत रुग्ण वाढत असल्याने 3 जुलैच्या रात्री 9पासून 13 जुलै रात्री 12पर्यंत 10 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर व सहकार्यांनी मागणी केली होती.
Check Also
नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्या
प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांचे आदेश; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास गती मुंबई : रामप्रहर वृत्तनवी …
RamPrahar – The Panvel Daily Paper