मुंबई : प्रतिनिधी
राज्यात अनलॉक-5च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सोमवार (दि. 5)पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी सरकारने नियमावलीही लागू केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे रेस्टॉरंटस् (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अॅण्ड बेव्हरेजेस (एफ अॅण्ड बी) युनिटस्, आऊटलेटस्, हॉटेल, रिसॉर्ट, क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांनी केले आहे.
मंगल कार्यालय संघटनेची आज बैठक
संगमनेर : राज्य सरकार दीडशे चौरस फूट आकाराच्या एसटी बसमध्ये 50 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देते. मग 10 ते 20 हजार चौरस फुट ते दोन एकर क्षेत्रफळ असलेल्या मंगल कार्यालयात विवाहासाठी 500 ते हजार लोकांना किंवा हॉल क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची मागणी लॉन्स व मंगल कार्यालय चालक, मंडप डेकोरेटर्स, केटरिंग, बँड आदी संघटनेच्या संगमनेरमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी सोमवारी (दि. 5) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणार्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.