मुरूड : प्रतिनिधी
वादळी पावसामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल झाला असताना या खराब हवामानाचा फटका मच्छीमारांनाही बसला असून, मिळकत तुटपूंजी आणि खर्चाचा वाढता बोजा यामुळे बोटी किनार्यावर शाकारण्यावाचून कोळी बांधवांना दुसरा पर्याय राहिलेला नाही.
कोकणातील रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. जिल्ह्यात सुमारे 25 हजार छोट्या-मोठ्या मच्छीमार बोटी असून, जवळपास अडीच लाख लोक या व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात, मात्र हा व्यवसाय सन 2019पासून सतत कूस बदलणार्या हवामानाच्या दृष्टचक्रात अडकल्याने मच्छीमार पुरते हैराण झाले आहेत.
यंदा तर आधी कोरोना, नंतर निसर्ग चक्रीवादळ आणि आता परतीचा वादळी पाऊस यामुळे मासळी पकडण्यासाठी खर्च मोठा होत असून, मिळकत मात्र तुटपुंजी झाल्याने बोटमालक दिवसागणिक कर्जबाजारी होत आहेत. त्यांना शासनाकडून मदत वा डिझेलचा परतावाही मिळत नसल्याने कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. याकडे राज्य शासनाने लक्ष देऊन आर्थिकदृष्ट्या दिलासा द्यावा, अशी मागणी मच्छीमार करीत आहेत.
Check Also
कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …
RamPrahar – The Panvel Daily Paper