नवी दिल्ली : देशातील प्रत्येक वाहनाला 1 जानेवारीपासून फास्टॅग असणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एका कार्यक्रमात त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती दर्शविली. त्या वेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. 1 जानेवारी 2021पासून प्रत्येक वाहनाला फास्टॅग बंधनकारक असणार आहे. फास्टॅगची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचे इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील, असे ते म्हणाले. फास्टॅग ही संकल्पना 2016पासून सुरू करण्यात आली. 1 डिसेंबर 2017च्या आधी विक्री झालेल्या वाहनांसाठीही फास्टॅग बंधनकारक असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Check Also
उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …
RamPrahar – The Panvel Daily Paper