Breaking News

सुधागडातील वावळोली येथील आंबा फळपीक कार्यशाळेला शेतकर्यांचा प्रतिसाद

पाली : प्रतिनिधी

फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंबा पिकाला जागतिक बाजारपेठेत सुगीचे दिवस आणण्याच्या दृष्टिकोनातून हॉर्ट सॅप योजनेअंतर्गत वावळोली (ता. सुधागड) येथील राजेंद्र राऊत यांच्या शेतावर गुरुवारी (दि.18) घेण्यात आलेल्या आंबा फळपीक कार्यशाळेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 कोकण कृषी विद्यापीठाच्या किल्ला रोहा येथील  कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी या कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन केले. आर जी मांजरेकर, तालुका कृषी मंडळ अधिकारी गायकवाड यांनी आंबापीक व कडधान्ये उत्पादनाविषयी महत्वाची माहिती दिली. गटशेतीद्वारे आपल्या पिकाचे ब्रॅण्डिंग करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतो, हे उपस्थित शेतकर्‍यांना सांगितले. या वेळी शेतकर्‍यांच्या विविध शंकांचे निरसन कृषी तज्ज्ञांनी केले. 

कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री रोहेकर यांनी केले.शेतीनिष्ठ शेतकरी शरद गोळे, पांडुरंग साजेकर, विठ्ठल कोंडे, सियोन वरसुलकर, बाळाराम गायकवाड, तुकाराम वांद्रे, अशोक सुतार, काशीनाथ राजीवडे, रामचंद्र गोळे महाराज, दिलीप लखीमळे यांच्यासह परिसरातील शेतकरी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. राजेंद्र राऊत यांनी आभार मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply