Breaking News

निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम चहरच्या नावावर

चेन्नई : वृत्तसंस्था

चेन्नई सुपर किंग्जचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात तब्बल 20 चेंडू निर्धाव टाकत आयपीएलमधील एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम सनरायजर्स हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज अंकित राजपूत यांच्या नावावर होता. त्यांनी प्रत्येकी 18 चेंडू निर्धाव टाकले होते.

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात चहरने ख्रिस लिन, नितिश राणा, रॉबिन उथप्पा या तिघांना झटपट बाद करीत दमदार कामगिरी बजावली. याशिवाय नंतरच्या टप्प्यात समोर आंद्रे रसेलसारखा तुफानी फलंदाज असतानाही चहरने तब्बल पाच चेंडू निर्धाव टाकले. त्यामुळे चहर हा आता सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply