पनवेल : रामप्रहर वृत्तजांभिवली गाव आणि जांभिवली वाडी यांची जाण्या-येण्याची होणारी अडचण लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चाने व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जांभिवली गावाच्या अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले. या नवीन रस्त्याचे रविवारी (दि. 20) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी विभागीय अध्यक्ष किरण माळी, केळवणे विभागातील नेतृत्व मंगेश वाकडीकर, आपटा विभागीय युवा मोर्चा अध्यक्ष कल्पेश कोंडीलकर, माजी सरपंच महादू निकम, मा. सरपंच विजय मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते भगवान देशमुख, ग्रा. सदस्य शेखर जाधव, ग्रा. सदस्य मुकेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील, बुथ अध्यक्ष कालुराम माळी, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कोंडीलकर, योगेश मुरकुटे, मनोहर कोंडीलकर, धर्मा कोंडीलकर, संजय कोंडीलकर, राजेश सोनावणे, महेश पाटील, राघो वाघ आदी उपस्थित होते.
Check Also
टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …
RamPrahar – The Panvel Daily Paper