Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीतील उपजिल्हा रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी शनिवारी (दि. 20) भेट देत नागरिकांना देण्यात येणार्‍या कोरोना प्रतिबंधक लसींची व साठवणुकीची माहिती घेतली, तसेच लस घेतलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार 1 मार्चपासून पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड-19 लसीकरणाचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील आठ सरकारी रुग्णालये, तसेच 10 खाजगी रुग्णालयांमध्ये हे लसीकरण चालू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी उपजिल्हा रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्र येथे जाऊन लसीकरणाचा आढावा घेतला.
या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply