नवी दिल्ली ः मान्सूनचे आगमन अंदमान निकोबार बेटावर झाले आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून लवकर हजेरी लावेल हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. यापूर्वी केरळमध्ये मान्सून वेळेआधी येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता अंदमान निकोबार बेटांवर मान्सून सरी बसल्याने 31 मेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटतील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे अंदमानमध्ये सरी कोसळल्यानंतर सात दिवसांत मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहचतो. यंदा सरासरीच्या 98 टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. या संदर्भातील परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper