पतियाळा ः वृत्तसंस्था
भारताची अनुभवी थाळीफेकपटू सीमा पुनिया हिने आंतरराज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला.
2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणार्या सीमाने 63.70 मीटर थाळीफेक करीत ऑलिम्पिकचा पात्रता निकष पार केला. 37 वर्षीय सीमा आता चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिने 2004 अॅथेन्स, 2012 लंडन आणि 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी सीमा ही भारताची दुसरी थाळीफेकपटू ठरणार आहे.
Check Also
साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत व्यवसायाची संधी द्यावी
असोसिएशनचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन; सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तआगामी दहीहंडी, …
RamPrahar – The Panvel Daily Paper