महाड ः भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत करण्यात येत आहे. या अंतर्गत रविवारीही तयार अन्नाची पाकिटे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मापारा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, मंडल अध्यक्ष सोपान जांभेकर, युवा नेते ललित पाटील, बिपीन महामुणकर, नाना महाले, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, युवा कार्यकर्ते हॅप्पी सिंग, अक्षय ताडफळे, श्वेता ताडफळे, मंजुषा आदी उपस्थित होते.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नाट्यसंहितेचे पूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘ही परी अस्मानीची’ …
RamPrahar – The Panvel Daily Paper