Breaking News

पं. नेहरू जयंती, बालदिन जासई हायस्कूलमध्ये उत्साहात

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती व बालदिन साजरा करण्यात आला.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष तसेच भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, उपमुख्याध्यापक मोरे, रयत सेवक संघाचे समन्वयक नुरा शेख, डी. बी. म्हात्रे, शिपाई मुंबईकर आदी उपस्थित होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply