महिला मोर्चातर्फे आज हळदीकुंकू समारंभ आणि चला खेळ खेळूया पैठणीचा कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर मंडल भाजप महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 20) नवीन पनवेल येथे हळदीकुंकू समारंभ आणि चला खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे. नवीन पनवेलमधील श्री संत साईबाबा शाळा येथे होणार्‍या या समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, उपमहापौर सीता पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्य व नगरसेविका दर्शना भोईर, महापालिका महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, ’अ’ प्रभाग समिती सभापती संजना कदम, ’ब’ प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील, ’क’ प्रभाग समिती सभापती अरुणा भगत, ’ड’ प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, माजी उपमहापौर व नगरसेविका चारुशीला घरत तसेच वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, जि. प. सदस्य रेश्मा शेळके, पं. स. सदस्य रेखा म्हात्रे, तनुजा टेंबे यांच्यासह आजी माजी नगरसेविका, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक यांनी केले आहे.

Check Also

Test post title

Test post content

Leave a Reply