Breaking News

सुभाष काटकर यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कामोठे सेक्टर 11 येथील स्वस्तिक प्लाझा सोसायटीत काही दिवसांपूर्वी एका भोजनालयाला आग लागली होती. यामुळे भोजनालयाच्या वर पहिल्या मजल्यावर राहणारे सुभाष महादेव काटकर यांच्या घराला या आगीची झळ लागून घराचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना मदत म्हणून भाजप कामोठे शहराच्या वतीने आत्तापर्यंत 3 लाखांची मदत करण्यात आली असून, यातील 1 लाख रुपयाचा धनादेश भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 28) सुपूर्द करण्यात आला.

या वेळी पनवेल महापालिकेेच्या प्रभाग समिती क सभापती सभापती अरुणा भगत, नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, विकास घरत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, समाजसेवक प्रदीप भगत, युवानेते हॅप्पी सिंग, जितू काटकर, सुशील शर्मा, युवामोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply