Breaking News

भाजप नेते कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते बनोटी (म्हसळा) येथे समाज मंदिराचे उदघाटन

म्हसळा : प्रतिनिधी

बदलत्या युगात तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे ते स्वीकारून नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी या समाज मंदिराच्या इमारतीचा वापर करावा, असे आवाहन भाजप नेते कृष्णा कोबनाक यांनी सोमवारी (दि. 16) म्हसळा तालुक्यातील बनोटी येथे केले.

चिंचबादेवी प्रासादिक भजन मंडळाने बनोटी येथे उभारलेल्या समाज मंदिराचे उद्घाटन सोमवारी कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात कोबनाक बोलत होते. भविष्यात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

गावातील बहुतांश कुटुंबे स्थलांतरित होत आहेत, ते थांबविण्याचे काम समाज बांधवांनी करावे, असे  कोबनाक या वेळी म्हणाले. मंडळातील सर्व ज्येष्ठ पदाधिकार्‍यांचा या वेळी यथोचित सन्मान करण्यात आला.

भाजपचे म्हसळा तालुका अध्यक्ष  प्रकाश रायकर, सरचिटणीस सुनील शिंदे, महेश पाटील शहर अध्यक्ष संतोष पानसरे, उपाध्यक्ष लहू तूरे, चिटणीस  मनोहर जाधव, दिलीप कोबनाक, गोविंद भायदे, महिला मोर्चा अध्यक्षा सुनंदा पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  ग्रामपंचायत मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र कांबळे, मुंबई मंडळ अध्यक्ष रघुनाथ भायदे, काशिनाथ कांबळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply