Breaking News

तळोजा परिसराचा विकास आणि वैभव अधिक उंचावण्यासाठी महायुती कटिबद्ध

प्रभाग 3मध्ये प्रचार दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळोजा : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीने आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. प्रभाग क्रमांक 3मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तळोजा परिसरातील ओवे येथे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केला.
महायुतीचे प्रभाग 3मधील उमेदवार निर्दोष केणी, विनोद घरत, मंजुळा कातकरी आणि प्रिती फुलाजी ठाकूर यांच्या समर्थनासाठी काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. या रॅलीत भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक पापा पटेल यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, भाजपच्या माध्यमातून परिसरात झालेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांचा आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून प्रभाग 3मध्ये महायुतीचा विजय 10 हजारांहून अधिक मताधिक्क्याने होईल, असा विश्वास व्यक्त केला तसेच तळोजा परिसराची शान आणि विकास अधिक उंचावण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचेही सांगितले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply