Breaking News

पुन्हा आणू या आपले सरकार!

आज पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पुन्हा आणू या आपले सरकार, या शीर्षकाखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर रविवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता भारतीय जनता पक्ष पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन होणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा रायगड भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनास बूथमधील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply