Breaking News

पनवेल बार असोसिएशनची निवडणूक होणार चुरशीची

पनवेल : वार्ताहर

पनवेल बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक येत्या 21 तारखेला होत असून नवीन जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले असून, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पनवेलमध्ये प्रथम दंड दिवाणी न्यायालय होते. या न्यायालयाच्या विविध दावे, प्रति दाव्यांसाठी नागरिकांना अलिबागला जावे लागत होते. त्यामुळे तीन साडेतीन तासाचा प्रवास तसेच इंधन व वेळेचा अपव्यय होत असे. अखेर 23 वर्षापासून सरकार दरबारी प्रलंबित मागणीला यश येवून पनवेलमध्ये जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाले. सत्र न्यायालय सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पनवेल बार असोसिएशनच्या कार्यकारिणी मंडळाची निवडणूक होत असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. दोन वर्षाच्या कालावधीसाठी होणार्‍या या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. मनोज भुजबळ व अ‍ॅड. संदीप जगे यांच्यात मुख्य लढत असून, उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. प्रफुल्ल म्हात्रे, अ‍ॅड. जे. डी. पाटील व अ‍ॅड. आर. के. पाटील तर सचिव पदासाठी अ‍ॅड. संतोष म्हात्रे व अ‍ॅड. प्रल्हाद खोपकर, तसेच खजिनदारपदासाठी अ‍ॅड. परवेझ खान, अ‍ॅड. सचिन म्हात्रे व अ‍ॅड. डी. बी. पाटील तर ऑडीटर पदासाठी अ‍ॅड. धनराज तोकडे व अ‍ॅड. शशिकांत मुंढे यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी अ‍ॅड. एच. के. शेळके निवडणूक अधिकारी, तर अ‍ॅड. राजेश पाटील व अ‍ॅड. शशिकांत म्हात्रे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply