Breaking News

मोरा येथे राष्ट्रीय सुरक्षा दिवस

उरण : वार्ताहर

ग्राइंडवेल नॉर्टन लि. मोरा येथे बुधवारी (दि. 4) 49वा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे ध्वजारोहन सकाळी 7.15 वाजता प्लांटहेड कमलजीत सिंग यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कर्मचारी व कामगारांनी सुरक्षेविषयी शपथ घेतली. कर्मचार्‍यांनी सुरक्षेविषयी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर सुरक्षेविषयी घेतलेल्या स्पर्धेत विजेत्यांना अधिकार्‍यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या वेळी प्लांटहेड कमलजीत सिंग, आर अ‍ॅण्ड डी प्रमुख व्हीस्पी कॉन्ट्रॅक्टर, सेफ्टी मॅनेजर वसंत मुत्तेपवार, पर्सनल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मॅनेजर आय. बी. सिंग, प्रोडक्शन सीनिअर मॅनेजर झहीर चौधरी, सेफ्टी ऑफिसर संदीप देशपांडे, मनोज म्हात्रे, जगदिश पाटील, विजय पवार, किरण घरत, दिनेश पवार, डॉमनिक कोळी, सेफ्टी मार्शल सदस्य व कामगार प्रतिनिधी, कामगार आदी उपस्थित होते. प्लांटहेड कमलजीत सिंग, सेफ्टी मॅनेजर वसंत मुत्तेपवार, प्रोडक्शन सीनिअर मॅनेजर झहीर चौधरी, मनोज म्हात्रे, जगदिश पाटील, विजय पवार, किरण घरत, दिनेश पवार, डॉमनिक कोळी आदींनी सुरक्षेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन मनोज म्हात्रे यांनी केले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply