Breaking News

कैद्यांचे विलगीकरण शाळेत

पनवेल : वार्ताहर

नव्याने येणार्‍या कैद्यांसाठी खारघरमधील एका शाळेत विलगीकऱण केंद्राची व्यवस्था कऱण्यात आली आहे. या केंद्रात 40हून अधिक कैदी असल्याने कारागृह पोलिसांचा परिसराला जागता पहारा आहे. खारघर येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता 2,124 असून सध्या कारागृहात 2500 हून अधिक कैदी शिक्षा भोगत आहेत. नव्याने येणार्‍या कैद्यांसाठी खारघर येथील गोखले शाळेत विलगीकरण केंद्र तयार कऱण्यात आले आहे व यात 40हून अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने कैद्यांच्या सुरक्षेसाठी सहा पोलीस तैनात केले आहेत. तर बाहेर भागावर लक्ष ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस मुख्यालयाचे चार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply