Breaking News

पोलिसांसाठी होमिओपॅथी औषधे

मोहोपाडा ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी परिसरात आपटा-खारपाडा चेक बुथ, दांडफाटा चेक बुथ, रसायनी कॉर्नर चेक बुथ, मोहोपाडा प्रवेशद्वार आदी ठिकाणी 24 तास चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे.रसायनी पोलीस डोळ्यांत तेल घालून नागरिकांचे संरक्षण करीत आहेत. या वेळी बंदोबस्तावर

असणार्‍या पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी मोहोपाडा येथील डॉ. प्रतीक जैन यांनी रसायनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्याकडे होमिओपॅथी औषधे सुपूर्द केली.या औषधाने पोलिसांना फायदा होणार असल्याचे डॉ. प्रतीक जैन यांनी सांगितले. या वेळी मोहोपाडा येथील व्यापारी प्रवीणकुमार जैन, विकी जैन उपस्थित होते. शासनाच्या चौथ्या लॉकडाऊन काळातील नियमांचे प्रत्येक नागरिकाने तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही डॉ. प्रतीक जैन यांनी या वेळी केले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply