Breaking News

रायगड जिल्ह्यात 653 नवे पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 653 नव्या कोरोना रुग्णांची आणि 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 16) झाली, तर दिवसभरात 844 रुग्ण बरे झाले.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 307, अलिबाग 111, पेण 62, माणगाव 43, कर्जत 38, रोहा 28, उरण 19, खालापूर 17, तळा 10, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी चार, मुरूड, म्हसळा व महाड प्रत्येकी तीन आणि पोलादपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे; तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात चार, पेण तीन, खालापूर दोन व अलिबाग तालुक्यातील एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 39,071 व मृतांची संख्या 1047 झाली आहे. जिल्ह्यात 31,661 जण कोरोनामुक्त झाल्याने 6363 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply