Breaking News

थेरोंडा समुद्रकिनारी पोलिसावर हल्ला

दोघा व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थेरोंडा समुद्र किनारी उभारलेल्या बीच कॅम्पींग व्यावसायिकांनी स्पीकर वाजविण्यास मनाई करणार्‍या पोलिसावर हल्ला केला.  रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थेरोंडा समुद्रालगत हरेश किशोर मारकू व शाम हरिश्चंद्र मारकू (रा. खंडेरावपाडा) यांनी बीच कॅम्पींग व्यवसाय  सुरू केला होता. या बीच कॅम्पींंगमध्ये मनोरंजनार्थ स्पीकर सुरू होते. रात्री सव्वादहाच्या सुमारास गस्तीवर असलेले  रेवदंडा पोलीस ठाण्याचे हवालदार विनोद गायकवाड  तेथे पोहचले. त्यांनी कॅम्पींगमधील स्पीकर बंद करण्यास सांगितले.

या गोष्टीचा राग आल्याने हरेश आणि शाम मारकू यांनी संगनमत करून हवालदार गायकवाड यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच त्यांना खाली पाडले. या घटनेचे वृत्त समजताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक थोरात यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन हस्तक्षेप केला. हरेश मारकू व शाम मारकू यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधीक तपास  उपनिरीक्षक शरद दुधे करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply