पेणमध्ये महामार्गावर अपघात

एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार मृत्युमुखी, 11 प्रवासी जखमी

पेण : प्रतिनिधी

 मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील नवेगाव गावाजवळ एसटी बसने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर एसटी बसमधील 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले.

मुंबई-गोवा महामार्गावरून एसटी बस (एमएच- 14,बीटी-2744) पाली येथून पेणकडे येत होती. त्याच वेळी कांचन लहू म्हात्रे (वय 42, रा. गडब. ता. पेण) हे त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच-06,बीबी-2667) वरून वडखळकडून गडबकडे येत होते. नवेगाव गावाजवळ एसटी बसने मोटरसायकलला समोरून धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार कांचन म्हात्रे जागीच ठार झाले, तर एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने बसमधील 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, एसटी बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव-मोर्बा रस्त्यावर शुक्रवारी रात्री दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण (विकी) रवींद्र भोईर (वय 40, रा. संगमेश्वर नगर, जुने माणगाव) यांचा उपचारादरम्यान रविवारी (दि. 28) मृत्यू झाला.  

प्रवीण भोईर हे शुक्रवारी (दि. 26) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून माणगाव-मोर्बा रस्त्याने येत होते. त्या वेळी त्यांची दुचाकी आणि समोरून आलेली दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण भोईर यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना रविवारी भोईर यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. 1) रात्री माणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. प्रवीण भोईर यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक दोन वर्षांचा मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. प्रवीण भोईर यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply