Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 70 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या  वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे 70 सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचअनुषंगाने गुरुवारी (दि. 11) महाशिवरात्रीनिमित्त पनवेलमध्ये रेल्वे स्थानकाजवळ व अन्य ठिकाणी गरीबांना 70 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके व कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या सोबतीने महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.                         

खिचडी वाटपाच्या वेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, सचिव सुरेश भोईर, ओमकार महाडिक, सदाशिव मोरे उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply