Monday , January 30 2023
Breaking News

श्रीरंग बारणेंच्या विजयाचा निर्धार

उरणमध्ये प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, भव्य रॅली

उरण : वार्ताहर

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उरणमधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10) करण्यात आले. या वेळी भव्य रॅलीही काढण्यात आली होती.

या समारंभास आमदार मनोहर भोईर, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, शिवसेना नेते माऊली घोगरे, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, जि. प. सदस्य विजय भोईर, पं. स. सदस्य हिराजी घरत, दीपक ठाकूर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, जसखारचे सरपंच दामुशेठ घरत, नगरसेवक राजेश ठाकूर, समीर मुकरी, अतुल ठाकूर, नगरसेविका वर्षा पाठारे, विद्या म्हात्रे, प्रियंका पाटील, सुजाता गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, धनाजी भोईर, कृष्णा घरत, संजय पाटील, विनोद रूपचंदानी, महेश कडू, एस. के. पुरो, रोहित पाटील, जयवंत पाटील, शैलेश भोईर, हस्तीमल मेहता, पुरुषोतम गुजर, महेश वर्तक, सुनील कडू, कमलाकर पाटील, संगीता पाटील, सोनारीचे माजी सरपंच महेश कडू, सुधीर घरत, चंद्रकांत घरत, सुरेश पाटील, प्रशांत पाटील, शेखर तांडेल, सुनील पाटील, शहनवाज मुकादम, उद्योजक प्रकाश ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply