मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे असे सागंत त्यांची बाजू घेतली आहे. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची तडजोड पदांसाठीच झाली आहे. यामध्ये हिंदुत्वाचा आणि निष्ठेचाही भाग नाही. शिवसेनेने तर मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्वाला मूठमाती दिली. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही, अनंत गीतेंनी सांगितले ते 100 टक्के खरे आहे, असे नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, गीते यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, यावर बोलताना राणे म्हणाले, अजून काय वाकडे करू शकतात. गीते यांना कदाचित फासावर लटकवतील. यांना दुसरे काय येते. अनंत गीतेंची जी अवस्था आहे तीच शिवसैनिकांची आहे. कोणीच त्यांना विचारत नाही. अनंत गीतेंचे चुकतेय कुठे, अशी विचारणाही या वेळी त्यांनी केली.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …
RamPrahar – The Panvel Daily Paper