Breaking News

अशोक बागमध्ये बसविली ड्रेनेजची नवीन लाइन; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील अशोक बाग येथे भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन ड्रेनेजची लाइन बसविण्यात आली आहे. विरुपाक्ष हॉलच्या समोरील अशोक बागमधील ड्रेनेज लाइन रस्त्याच्या काम करताना ढिगार्‍याखाली दबली गेली होती. त्यामुळे ड्रेनेज लाइन पूर्ण निकामी होऊन सांडपाण्याचा निचरा होत नव्हता. या विषयाची माहिती अशोक बागमधील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना दिली. रहिवाशांच्या आरोग्याचा विषय लक्षात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी ड्रेनेजची नवीन लाइन तत्काळ बसवून घेतली. प्रभागातील रहिवाशांच्या आरोग्याचा विषयला नेहमीच प्राथमिकता देतात त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …

Leave a Reply